सामान्य माणूस हाच योजनांचा केंद्रबिंदू – शफी शेख

0
सामान्य माणूस हाच योजनांचा केंद्रबिंदू - शफी शेख

उदगीर (एल.पी.उगीले)शासनाच्या सर्व योजना या सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या असतात,या योजना ग्रामदरबारच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहचत आहेत असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी शफी शेख यांनी केले.चांदेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामदरबार कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी चेअरमन धोंडीराम मुसने होते, तर मंचावर सरपंच सुधाकर मुसने,विस्तार अधिकारी ए.एन.बिरादार, डॉ.श्रुती तोगरीकर, केंद्रप्रमुख एम.झेड. लांडगे, डी.एम. भोसले,आर.व्ही‌.गायकवाड,एम.व्ही. माने,बी.एन.टेकाळे, आर.जी. मोमीन, छाया मदाळे, पी.व्ही.चौहान, एस.डी. निवळकर,एस.एच.उलीगडे, ग्रमसेवक भीम महांडोळे,एस.वाय.मोघेकर उपस्थित होते.
सरपंच सुधाकर मुसने यांनी प्रास्ताविक केले.धनंजय गुडसूरकर या उपक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा, असे सांगून आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच शिक्षण द्यावे.असे आवाहन शेख यांनी पुढे बोलताना केले. विस्तार अधिकारी बिरादार यांचेही मार्गदर्शन झाले. तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजयकुमार घोन्सीकर यांच्या उपस्थितीत सरपंच सुधाकर मुसने यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून उद्घाटन झाले. उमाकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. शासनाच्या विविध विभागांच्या वतीने योजनांचे स्टाल लावण्यात आले होते.आरोग्य विभागाच्या वतीने २२५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!