संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार व बँकेची माहिती संबंधी कार्यक्रम

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार व बँकेची माहिती संबंधी कार्यक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालय उदगीर येथे विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार व बँकेची माहिती या संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी शाळेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे बँक मॅनेजर विष्णू ममीदी व नांदेड जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष रामदास माळेगावे संस्थेचे अध्यक्ष गोविंद निटूरे, शाळेच्या मुख्याध्यापिका जगताप अनिता, सोमवंशी शिवाजी, सोमवंशी कालिदास, यांच्या उपस्थितीमध्ये सदरील कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार व बँकेविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सेंट्रल बँकेचे शाखा अध्यक्ष विष्णू उपस्थित होते. त्यावेळी मुलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून आपल्या प्रश्नांचे समाधान करून घेतले. बँक म्हणजे जीवन आवश्यक अशी बाब आहे, असेही सांगितले. तसेच बँकेमध्ये पैसे ठेवल्यामुळे काय फायदे होतात ते सांगितले, बँकेतून कोणकोणत्या योजना राबवल्या जातात, ते पण विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांविषयी असलेल्या विविध योजना व माहिती सांगितली, तशीच त्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना, मोबाईल पाहत असताना तसेच वेगवेगळे कॉल आलेले आपण काळजीपूर्वक हाताळायला पाहिजेत असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
तसेच जागतिक चिमणी दिवस असल्याने पक्षी व चिमणी यांच्या साठी पाणी व खाद्य म्हणून तांदूळ हे कायमस्वरूपी शाळेच्या शेवटच्या मजल्यावर मान्यवर यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!