शिक्षकांची ऑनलाइन बदली अंतर्गत कार्यशाळा
उदगीर (एल.पी.उगीले)
शिक्षण विभाग प. स.उदगीर येथील सभागृहामध्ये गटशिक्षणाधिकारी शफी शेख, विस्तार अधिकारी थोटे, गोविंदराव बारसंगे, केंद्रप्रमुख बालाजी धमनसूरे, राघोबा घंटेवाड, अशोक खेळगे, शेषराव राठोड, मारोतीराव लांडगे, रामशेट्टे आदी जणांच्या उपस्थितीत बदली सुधारीत परिपत्रक दिनांक 18 जून 2024 विषयावर सविस्तर माहिती दिली. या संदर्भात शासन निर्णय, बदली व्याख्या, संवर्ग 1,संवर्ग 2,संवर्ग 3,संवर्ग 4 या संदर्भात सविस्तर माहिती गटशिक्षणाधिकारी शेख , तंत्रस्नेही शिक्षक चांद पठाण, ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितली. या बदली कार्यशाळेसाठी उदगीर तालुक्यातील सर्व 12 केंद्राचे केंद्रप्रमुख व तंत्रस्नेही शिक्षक, प्रशाला मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित राहून बदली संदर्भात सर्व माहिती घेतली.
