खेळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास सहजपणे होतो – डॉ. प्रा. मोघे गोपाळ

0
खेळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास सहजपणे होतो - डॉ. प्रा. मोघे गोपाळ

उदगीर (एल.पी.उगीले) विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत, मैदानी खेळातून शरीर तंदुरुस्त बनते व खेळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास सहजपणे होतो. असे उद्गार शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या माध्यमातुन व्यक्तिमत्व विकास या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ.प्रा.मोघे गोपाळ लक्ष्मीकांत क्रीडा संचालक महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा यांनी काढले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ.अजित मोदजकर ,आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. विष्णू पवार, क्रीडा संचालक प्रा. नेहाल खान उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ .मोघे म्हणाले की,शारीरिक व मानसिक दृष्ट्या खेळाडू खेळातून कणखर बनतात.व्यक्तिमत्व विकासात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नेतृत्वगुण, एकात्मता व बंधुभाव. खेळाच्या माध्यमातून संघ भावना वाढते. एकमेकाविषयी आदर निर्माण होतो, बंधुभाव वाढतो असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. रामकिशन मांजरे यांनी अध्यक्षीय समारोप केला.तर प्रा.डॉ. विष्णु पवार यांनी आभार मानले. कार्यकमाचे सुत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. नेहाल अहमद खान यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!