मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी नेतृत्व परिषद आणि विज्ञान प्रदर्शनी उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले)
मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये नुकतेच विद्यार्थी नेतृत्व परिषद आणि विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला आय डब्ल्यू सी प्रेसिडेंट विजयमाला भुसारे, योग प्रशिक्षिका भातांब्रे लाभल्या होत्या. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक प्रगती, नेतृत्व कौशल्ये आणि वैज्ञानिक सृजनशीलता प्रदर्शित करण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
विद्यार्थी नेतृत्व परिषद ही एक खास संकल्पना होती, जिथे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा आढावा घेतला आणि पालक व शिक्षकांसमोर आपली प्रगती सादर केली. त्यांनी आपले शैक्षणिक यश, क्षमता आणि सुधारण्याच्या संधींवर चर्चा केली, ज्यामुळे आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. पालकांनीही सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल महत्त्वपूर्ण संवाद साधला.योग प्रशिक्षिका भातांब्रे यांनी मुलांबरोबर संवाद साधत, आहार, परिक्षेविषयी मार्गदर्शन केले.
या वेळी विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे आणि प्रयोगांचे प्रदर्शन करण्यात आले. पर्यावरणपूरक उपाय, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यां सारख्या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांकडून माहीती देण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य पठाण त्यांनी केली व सुत्रसंचालन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
आभार प्रदर्शन संजय हुडगे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
