अखंड हरिनाम सप्ताहात 31 दात्यांकडून रक्तदान,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान होय -डॉ.योगीराज चिद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी जीवनामध्ये हे दान दुसऱ्याचे प्राण वाचू शकते. असे विचार प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ योगीराज चिद्रे यांनी व्यक्त केले. ते बदलापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी उपस्थित भाविकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.रक्तदानाचा सर्वात मोठा आरोग्यदायी फायदा म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारणे. वारंवार रक्तदान केल्याने शरीरातील लोहाची योग्य पातळी राखण्यास मदत होते.रक्तदान केल्याने वजन व्यवस्थापनातही मदत होऊ शकते. रक्तदान केल्याने प्रत्येक वेळी सुमारे ६५० कॅलरीज बर्न होतात. शारीरिक आरोग्य सुधारण्या व्यतिरिक्त, रक्तदान केल्याने अनेक मानसिक आरोग्याचे देखील फायदे होऊ शकतात. तुमचे रक्त अनेकांचे जीव वाचवू शकते असेही सांगितले.
ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या रक्तदान सोहळ्यामध्ये 31 बॉटल रक्तसंकलन करण्यात आले.तातेराव देवर्षे, पूजा देवर्षे, प्रवीण म्हेत्रे ,सोम बिरादार, स्वप्निल जाधव ,सतीश देवर्षे, किरण तोंडारे, पांडुरंग देवर्षी ,संतोष कांबळे, माधव देवर्षे, तानाजी पवार, माधव देवर्षे, रवींद्र म्हेत्रे , ज्ञानेश्वर बिरादार, गोविंद बिरादार, राम काकनाळे, शिवराज म्हेत्रे, संभाजी देवर्षे, व्यंकटेश तादलापुरे, सचिन तोंडारे, स्वाती तोंडारे, प्रशांत बिरादार, प्रदीप काकनाळे, शिरीष देवर्षे, महेंद्र बिरादार ,रवींद्र बिरादार ,मनोज तोंडारे, प्रियंका जाधव ,प्रदीप म्हेत्रे, शिवशंकर पाटील व राजकुमार काकनाळे यांनी रक्तदान करून सहकार्य केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्याम तोंडारे,बालाजी बिरादार, चंद्रशेखर पाटील, पंकज पाटील, सरपंच अंबिका पाटील, राजेश्वर पाटील, कामाजी काकनाळे, शिवाजी देवर्षे, यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रमुख पाहुण्यांचे सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गुरुजी यांनी केले तर आभार शिवशंकर पाटील यांनी मानले.
