पवित्र रमजान म्हणजे समाजात एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव – आ. संजय बनसोडे

0
पवित्र रमजान म्हणजे समाजात एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजातील एकोपा वाढवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन समाज बांधवांकडुन करण्यात येते. या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडुन रोजा धरुन ३० दिवस कडक उपवास केले जातात. प्रत्येक धर्माचा मूळ अर्थ प्रेम आहे. आपुलकी,जिव्हाळा आहे.आपण कोणाची निंदा करायची नाही, कोणाची निंदा ऐकायची नाही, वाईट कुणाचे करायचे नाही. हे पावित्र्य रोजच्या महिन्यात आहे.
माणुसकी धर्माची शिकवण देणाऱ्या उच्चप्रतीच्या मानवी सद्गगुण्यांना चालना देणाऱ्या या पवित्र रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देवुन, पवित्र रमजान म्हणजे समाजात एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव असल्याचे मत माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते पवित्र रमजान महिन्यानिमित्त उदगीर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सय्यद जानीमियाँ यांनी मकबरे नवाबान मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी आयोजीत केली होती. यावेळी आ.संजय बनसोडे उपस्थित बांधवांना संबोधित करत होते.
यावेळी भंन्ते नागसेन बोधी, ऍड.व्यंकटराव बेद्रे,मौलाना अजीजुर रेहमान, मौलाना एजाज – उल – हक, डाॅ.शफिक शेख, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर,पो.नि.राजकुमार पुजारी, सत्तार भाई, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, विजय निटुरे, अनिल मुदाळे, फय्याज शेख, शाम डावळे, , शफी हाशमी, इमरोज हाशमी, जितेंद्र शिंदे, अनिरुध्द गुरुडे, अभिजित औटे, ज्ञानेश्वर बिरादार, कुणाल बागबंदे, मोईन शेख, नरसिंग शिंदे, शमशोद्दीन जरगर, राहुल सोनवणे, अझहर मोमीन, मजहर पटेल, अश्रफ देशमुख, वसिम बाबा, अविनाश गायकवाड, सतिश कांबळे, राजकुमार गंडारे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!