मा.म. देशमुख यांना संभाजी ब्रिगेडतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

0
मा.म. देशमुख यांना संभाजी ब्रिगेडतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

उदगीर (एल.पी.उगीले) आपल्या परखड वाणीने, लेखणी आणि प्रभावी प्रबोधनाने बहुजनांचे मन, मनगट आणि मस्तक सशक्त करणारे थोर इतिहासकार, तत्त्ववेत्ता, अभ्यासक, इतिहास संशोधक आणि विचारवंत स्व. मा.म. देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेड लातूर जिल्हा शाखेच्या वतीने उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री प्रदीप ढगे यांनी मा‌ म. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्यासोबत प्रा. विवेक सुकणे, जमील अत्तार, संग्राम पताळे, माधव हलगरे अहमद सरवर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माने यांनीही मा म देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करत त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. उपस्थित सर्वांनी मा म देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमजी फड, जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बळवंत चिंचोलकर, तालुकाध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, जिल्हा सहसचिव शिवश्री व्यंकटजी थोरे,मनोहर हिंडे, संतोष गुंगेवाड,भास्कर मोरे, कालिदास जी निटुरे , गणपत गादगे पाटील, कानोटे राजकुमार, मुरलीधर बिरादार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई जाधव आणि रेखाताई कदम यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा.म. देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत बहुजन समाजाच्या उत्थानासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!