पत्रकार दत्ता पाटील यांना जिवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
देवणी (एल.पी.उगीले): येथील दै. देशोन्नती चे तालुका प्रतिनिधि दत्ता पाटील यांनी अवैध दारू धंद्याची बातमी छापल्याचा कारणा वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देवणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबतीत पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यात तालुक्यातील अवैध देशी दारू जप्त केल्याची बातमी दैनिक देशोन्नती या दैनिकात प्रकाशित झाली होती. याचा राग मनात धरून ‘ माझ्या मुलाची बदनामी करतो का? म्हणुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून परिवारास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली .या प्रकरणी देवणी पोलिसात पत्रकार संरक्षण कायद्या नुसार हनुमंत रंगराव घोनशे (रा. तळेगाव ता. देवणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतचा अधिक तपास देवणी पोलीस कडून करण्यात येत आहे.
या घटनेचा तालुका पत्रकार मित्र मंडळाकडून निषेध होत आहे.
