कै. विलासराव देशमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

0
कै. विलासराव देशमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

उदगीर (एल.पी.उगीले) कै. विलासराव देशमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., उदगीर यांच्या 2025 ते 2030 या कार्यकाळातील पदाधिकाऱ्यांची निवड पतसंस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी श्रेणी-1 संलग्न सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उदगीर डी. बी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीत यशवंत किशनराव बिरादार यांची चौथ्यांदा चेअरमन पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून केंद्रे आनंद देविदासराव, सचिवपदी तोडकर मंगेश काशिनाथराव, तर सहसचिवपदी बिरादार राम नामदेवराव यांची बिनविरोध निवड झाली.
संचालक मंडळात पाटील बाळासाहेब शिवाजीराव, जाधव संजीवकुमार, मोहिते सचिन निवृत्तीराव, श्रीमती जाधव मनोरमा, श्रीमती शिंदे पुष्पा केशव, गुंडीले राजीव मारुती आणि वाघ बालाजी अशोकराव यांची संचालक म्हणून निवड झाली.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!