डॉ.नरसिंग कदम यांची संभाजीनगर येथील तिफण संपादक मंडळ सदस्य पदी निवड
उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य तथा छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक साहित्यिक,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे डॉ. नरसिंग कदम यांची संभाजीनगर येथील तिफण त्रेमासिकाच्या संपादक मंडळावर सदस्य म्हणून २०२५ ते २०२७ या वर्षासाठी निवड झालेली आहे. कन्नड सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून प्रसिद्ध होणारे,भाषा, साहित्य, कला आणि लोकसंस्कृतीला वाहिलेले त्रैमासिक तिफणने सोळाव्या वर्षात पदार्पण केले आहे. तिफणचे आजपर्यंत अनेक महत्वाचे विशेषांक प्रसिद्ध झालेले आहेत. तिफणच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. दर दोन ते तीन वर्षात तिफण संपादक मंडळाची पुनर्रचना करण्यात येते. आजपर्यंत अनेकांना संपादक मंडळावर संधी मिळाली आहे. २०२५ – २०२७ साठी डॉ. कदम यांचे कार्य पाहून त्यांची निवड करण्यात आलेली आहे तशा निवडीचे पत्र त्यांना तिफणचे संपादक शिवाजीराव हुसे यांनी प्रदान केले. डॉ कदम यांनी साहित्यिक क्षेत्रात जीवनशैली, निर्भया , गोंडर, धडक बेधडक, संघर्षयोद्धा बापूसाहेब हे कवितासंग्रह,. गड्या आपुला गाव बरा-बाल कथासंग्रह, श्रीराम गुंदेकर : व्यक्ती आणि वाङ्मय,महानुभाव संप्रदाय : स्वरूप आणि विशेष,महात्मा फुले यांचे कार्य : शोध आणि बोध,महात्मा फुले : साहित्य आणि विचार,आधारस्तंभ बाप,कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि मार्क्सवाद, आधुनिकीकरण आणि बदलते आयाम,मराठी भाषिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी,सहसंपादक- जागतिकीकरण आणि मराठी साहित्य, संपादकीय सदस्य-लातूर वसा आणि वारसा हे त्यांचे संपादित ग्रंथ आहेत. आधुनिक मराठी साहित्य समीक्षा,
आंबेडकरवादी साहित्य समीक्षा हे समीक्षा ग्रंथ असे त्यांचे एकूण वीस ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. रक्तदान शिबिर,रक्तगट तपासणी शिबीर,पल्स पोलिओ अभियान, ग्रामस्वच्छता अभियान, बोर पुनर्भरण, शोषखड्डे, डेंगू,मलेरिया, हत्तीरोग, वैज्ञानिक जाणीव जागृती या संबंधाने रॅलीचे आयोजन केलेले होते. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदपूर तालुकाध्यक्ष, रोटरी क्लब सदस्य आदी स्वरूपाचे विविध सामाजिक कार्य केलेले आहे.त्यांचे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय नियतकालिका मध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.यापूर्वी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्तरावरील साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये ते सातत्याने लेखन करत असतात.या निवडीबद्दल त्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी.टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सहसचिव हिरागीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, सदस्य ज्ञानदेव झोडगे, रामराव एकंबे,काकासाहेब पाटील, भिमराव पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, प्रबंधक बालाजी पाटील , शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्र परिवार , नातलग यांनी अभिनंदन केले आहे.
