विचार अनुभवजन्य होत नाही, तोपर्यंत स्वीकारला जात नाही – ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज देगलूरकर

0
विचार अनुभवजन्य होत नाही, तोपर्यंत स्वीकारला जात नाही - ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज देगलूरकर

उदगीर (एल.पी.उगीले)
‘विचार अनुभवजन्य होत नाही, तोपर्यंत स्वीकारला जात नाही’असे मत ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितले. सद्गुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमद्भगवद्‌गीता अंतरंग दर्शन या प्रवचन मालेत त्यांनी पहिले पुष्प गुंफले.
उदगीरच्या लाल बहादुर शास्त्री विद्यालयात आयोजित प्रवचन मालेचे हे ५ वे वर्ष आहे. ही प्रवचनमाला तीन दिवस चालणार आहे.
गीता पाठ करणे अथवा अर्थासह सांगता येणे म्हणजे गिता समजने नव्हे, तर गीतेच्या प्रत्येक अध्ययाच्या अनुषंगाने अर्जुनाच्या जीवनातील परिवर्तन शोधता येणे, हा गीतेचा अभ्यास होय. असे सांगुन कर्माचे फळ हे मर्यादित असल्याचे ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगीतले. माणुस स्वतःवर प्रयोग करुन घ्यायला तयार नसतो, त्यामुळे उपदेश सहजासहजी ऐकला जात नाही. उपदेशाला प्रमाण असेल तर उपदेश ऐकला जातो. असे सांगुन साधनेवरचा विश्वास हा साधनेच्या अनुभवाच्या परिणामावर असतो, असे महाराज पुढे बोलताना म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!