मानस देशमुख महावाचन स्पर्धेत तालुक्यात प्रथम
उदगीर :(एल.पी.उगीले)येथील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आयोजित महावाचन उत्सव 2024 समग्र शिक्षा, जिल्हा परिषद लातूर महावाचन लेखन स्पर्धा तीन भिन्न वयोगटात घेण्यात आली.
यात लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील मानस संजय देशमुख हा ९ वी ते १२ वी या गटात तालुका स्तरीय वाचन स्पर्धेत सर्वप्रथम आला आहे .यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या एखाद्या पुस्तकावर परिक्षण लिहिणे अपेक्षित होते. यात मानसने विश्वास नांगरे पाटील लिखित” मन है विश्वास” या पुस्तकाचे परिक्षण लिहिले होते.लातुर येथे स्काऊट गाईड कार्यालयात वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) प्रमोद पवार उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी मानसला लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील त्याच्या वर्ग शिक्षिका सविता कोरे व मराठी विषयाच्या शिक्षिका अनिता येलमटे,नीता मोरे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वीते बद्दल स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, कार्यवाह शंकरराव लासुणे,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे,उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक कृष्णा मारावार,किरण नेमट, माधव मठवाले यांसह सर्व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.
