उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेसे यश, देश पातळीवरील विधी परीक्षेत ॲड. शिवानी हावा प्राविण्यासह उत्तीर्ण, अभिनंदनाचा वर्षाव

0
उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेसे यश, देश पातळीवरील विधी परीक्षेत ॲड. शिवानी हावा प्राविण्यासह उत्तीर्ण, अभिनंदनाचा वर्षाव

उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर येथील रहिवासी ॲड. शिवानी सुनिल हावा यांनी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय विधीज्ञ परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेल असा मान आणि सन्मान वाढवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
अँड. शिवानी हावा यांनी 2023 मध्ये संत तुकाराम विधी महाविद्यालय, उदगीर येथून विधी शाखेची पदवी लातूर जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त करून मिळवली होती. त्यांचे शालेय शिक्षण संग्राम स्मारक विद्यालय आणि उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर त्यांनी हावगीस्वामी महाविद्यालयातून कला शाखेची पदवी पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये डी एम एल टी (लॅब टेक्निशियन) डिप्लोमा पूर्ण केला आहे.
अत्यंत जिद्दीने शिक्षण घेत ही विधी परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या ॲड. शिवानी हावा यांचे विशेष कौतुक होत आहे.
समाजातील प्रत्येकाच्या यशाचे कौतुक करून त्यांना प्रसिद्धी देणे आणि मानसन्मान वाढवण्याचे कार्य करणाऱ्या, पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे स्टार दर्पण न्यूज चॅनेलचे संपादक सुनील हावा यांचे सुकन्या असलेल्या ॲड. शिवानी हावा यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!