आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर येथे शांतता कमिटी बैठक संपन्न.

0
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर येथे शांतता कमिटी बैठक संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले) आगामी रामनवमी आगामी रामनवमी ,गुढीपाडवा व रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार असून त्या अनुषंगाने जिल्हयात सामाजिक सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. या दृष्टिने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे अध्यक्षतेखाली दि. 28 मार्च रोजी उदगीर पोलीस ठाण्यात रामनवमी महोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधव यांचे उपस्थितीत बैठक पार पडली.
सदर बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी (उदगीर) मनीष कल्याणकर, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंह आनलदास,उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, तहसीलदार राम बोरगावकर यांच्यासह इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रामनवमी कमिटीचे अध्यक्ष अजय नवरखेले, गोविंद अण्णा केंद्रे, गुलाबराव पटवारी, मौलाना हाजीउर रेहमान, मौलाना जाकीर आत्तार यांच्यासह विविध जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या उत्सव अनुषांगाने आयोजित कार्यक्रम व त्यांना येणाऱ्या समस्यां बाबत चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले. सोमय मुंडे यांनी आवाहन केले आहे की, सण-उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लघंन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.जयंती उत्सव दरम्यान अचानक एखादा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची प्रशासनास माहिती द्यावी. वाहतुक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.मिरवणुका ह्या डीजे डॉल्बी विरहीत, पारंपारीक वाद्याचा वापर करुन दिलेल्या मार्गानेच व नेमुण दिलेल्या वेळेच्या आत शांततेत पुर्ण करव्यात.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सदरचे उत्सव विधायक कार्यक्रम करुन साजरा करण्यात येईल. उत्सव समिती, नागरीक व पोलीस यांचे समन्वयाने जिल्हाभरात उत्साहात व शांततेत पार पडेल अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केली.
सदर बैठकीस लातूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक,शांतता कमिटीचे सदस्य, रामनवमी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, व्यापारी बांधव, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!