गावोगावी “ग्राम आदर्श विद्यार्थी पुरस्कार” वितरणाची सुरुवात करावी – विनयकुमार ढवळे
अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव ग्रामपंचायत देणार दरवर्षी पुरस्कार
अहमदपूर ( गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्यातील एस.एस.सी बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून अहमदपूर तालुक्यातील सांगवी (सु) येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील योगेश अनिल व्हडगीर याने प्रथम क्रमांक मिळविला असून त्यानिमित्ताने सुनेगाव(सां) येथील ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य विनय ढवळे यांनी दहावी बोर्ड परीक्षा मध्ये प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत सांगवी,सुनेगाव,सांगवीतांडा मधून दहावी व बारावी बोर्ड परीक्षा मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना “ग्रामपंचायत आदर्श विद्यार्थी पुरस्कार” देण्यात यावा अशा प्रकारची मागणी ग्रामपंचायतकडे करून तसा ठराव मंजूर करुन, येत्या 15 ऑगस्टच्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून तो पुरस्कार आदर्श विद्यार्थ्यांना वितरित केला जाणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे सन्मान व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना “ग्रामपंचायत आदर्श विद्यार्थी पुरस्कार” ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावोगावी दिला गेला तर विद्यार्थी मोठ्या तुरशीने अभ्यासाला लागतील व त्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढीस मदत होईल आणि पालकांचा व विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलेल.
या गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पंचायत समितीचे माजी उपसभापती देविदासजी सुरनर, ग्रामपंचायत सदस्य- मारुती लवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य- शिवाजी ढवळे , मुरलीधर सुरनर, प्रल्हाद माडगे, माधव ढवळे, दगडू माडगे, रघुनाथ तुरेवाले, अनिल व्हडगिर, दिनेश सुरणर, दीपक कोपनर, चंद्रकांत माडगे, आदी ग्रामस्थ ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हनुमंत व्हडगिर यांनी मानले.