संताचे कार्य मानवाच्या कल्याणासाठी – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

संताचे कार्य मानवाच्या कल्याणासाठी - प्रा.मारोती बुद्रुक पाटील

आषाढी एकादशीनिमित्त प्रवचन सोहळा.

अहमदपूर ( गोविंद काळे) : संतानी भक्तीच्या क्षेत्रांत जातीयतेला पूर्णपणे गाडले असून भक्तीच्या मार्गाने मनुष्याचा उधार करण्यासाठी संत जन्माला आले संताचे कार्य हे मानवाच्या कल्याणासाठीच आहे असे प्रतिपादन प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
वाघोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावकरी बांधवांच्या वतीने भव्य प्रवचन सोहळा व किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी प्रवचनातून संताच्या कार्याची महती व विठ्ठलाची महिमा आणि सुखाची प्राप्ती कशी करावी असे सांगितले.
सुखालागीं करिसी तळमळ । तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ।।१।।
मग तूं अवघाची सुखरूप होसी । जन्मोजन्मींचे दु़ःख विसरसी ।।२।।
चंद्गभागे करितां एक स्नान । तुझे दोष पळती रानोरान ।।३।।
लोटांगण घालितां महाद्वारीं । कान घरोनि नाचतां गरुडपारीं।।४।।
नामा म्हणे उपमा काय द्यावी । माझ्या विठोबाची आलावला घ्यावी ।।५।|
भागवत धर्माचे प्रसारक संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचे निरुपण करताना प्रा.मारोती बुद्रुक पाटील म्हणाले की या मनुष्यदेहाला प्रत्येकाला सुखाची प्राप्ती हवी आहे. सुख आणि दुःख याची संमिश्र शिदोरी म्हणजे जीवन.
मनुष्य प्राण्याला संसारात सुख हे मृगजळासारखे आहे. मृत्युलोकी सुखाची कहानी कुठेही ऐकायला मिळत नाही.या मनुष्यदेहाला सुखाची प्राप्ती करायची असेल तर पंढरीला जा असे संतानी सांगीतले. सुखा लागी करीशी तळमळ तरी पंढरीसी जाय एक वेळ. परंतु या कोरोनाच्या महामारी मुळे इच्छा असूनही वारकऱ्यांना पंढरीशी जाता आले नाही परंतु घराघरात वारकऱ्यांनी मनोमनी पंढरीची वारी करावी दुःखाच्या निवृत्ती मधून परमानंदाची प्राप्ती करावी. विटेवर उभा असणारा आनंदाचा कंद आठवावा.मुक्तीची, मोक्षाची, प्रमोच्य सुखप्राप्ती ची मनोमनी पंढरीची वारी करावी.
महाराष्ट्राला संतांची खूप मोठी देणगी आहे. संतांनी प्रत्येक गावाला तीर्थस्थान बनविण्यासाठी प्रयत्न केले.मानवासाठी प्रेमाचा वर्षाव केला
भक्ती आणि प्रेम नसलेले जीवन हे निरर्थक आहे असे सांगितले.

About The Author