ग्रामीण रुग्णालयाला ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ व व्हेंटिलेटर भेट!

ग्रामीण रुग्णालयाला 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' व व्हेंटिलेटर भेट!

अहमदपूर( गोविंद काळे ) : येथे एन.राचमाळे फाउंडेशनच्या वतीने
ग्रामीण रुग्णालय, अहमदपूरला सामाजिक बांधिलकी जपत ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ व व्हेंटिलेटर मशीन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आले. कोरोनाच्या काळात माणूसच आपल्या मदतीसाठी धावून येतो, हे आपण अनुभवलं आहे. हीच माणुसकीची भावना जपत एन.राचमाळे फाउंडेशनने रुग्णांच्या सेवेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

यावेळी लातूर परिमंडळ उपसंचालक एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉअशोक आरदवाड, संजय आयचीत, सभापती शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प.सदस्य माधवराव जाधव, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ.सिंहाते, डॉ.अमृत चिवडे, डॉ.देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ जोंधळे, शहराध्यक्ष अझहरभाई बागवान, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, तानाजी राजे, फेरोज शेख, आशिष तोगरे, व्यंकट वंगे, शिवशंकर आगलावे, ग्रामीण रुग्णालय,अहमदपूर अधिकारी कर्मचारी तसेच एन.राचमाळे फाउंडेशनहे सदस्य यांची उपस्थिती होती.

About The Author