हिवरा येथे बंद घराचे लॉक तोडून चोरी
महागाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिवरा संगम येथे चोरीचे सत्र सुरूच असून येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी 40 हजार रोख व 10 हजार रुपयांचे सॅमसंग केबल चोरून नेली आहे. हिवरा येथील दादाजी नगर येथील रहिवासी डॉ दीपक तायडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी बुधवार 21 जुलै रोजी कपाटमधील साहित्य कपडे, साड्या अस्ताव्यस्त करून 40 हजार रोख व सॅमसंग कंपनीचे केबल 10हजार रुपये असा एकूण 50 हजार चोरून नेले. तायडे कुटुंब हे मुलाच्या भेटी साठी घराला कुलूप लावून यवतमाळला गेले असताना अंदाजे रात्री 12.30 च्यासुमारास सदर घटना घडली आहे.या घटनेची सर्व माहिती पोलीस पाटील प्रवीण कदम यांनी महागाव पोलिसांना दिली त्यानंतर तात्काळ तत्परता दाखवत महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेप्ललू, सहाययक पोलीस निरीक्षक भोस, उपनिरीक्षक राहुल वानखेडे,बीटजमादार रुपेश चव्हाण,जामदार विनोद जाधव,पोलीस शिपाई मस्के घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून पंचनामा केला तसेच डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञाने पथक पाचारण करण्यात आले.तर श्वानाने तायडे यांच्या घरापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत माग काढला व तेथेच घुटमळले.तर याप्रकरणी महागाव पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास महागाव पोलीस करत आहेत.
बाहेर गावी जाताना नागरिकांनी आपले मौल्यवान वस्तू व रक्कम सुरक्षित ठेवावे आणि नागरिकांनी सतर्क राहावे : विलास चव्हाण ठाणेदार महागाव