मलकापूरच्या जान्हवी पवारने राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत एक सुवर्ण आणि तीन रौप्ये पदक पटकावले

0
मलकापूरच्या जान्हवी पवारने राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत एक सुवर्ण आणि तीन रौप्ये पदक पटकावले

उदगीर (एल.पी.उगीले)
दिनांक 27 मार्च ते 30 मार्च या कालावधीत गुंटूर आंध्र प्रदेश येथील झालेल्या मिनी सब जुनियर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये जान्हवी बाबाराव पवार यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत
महाराष्ट्राला एक सुवर्ण आणि चार रोप्य पदक प्राप्त करून दिले.
जान्हवी पवार ही लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील मलकापूर या गावची कन्या आहे .15वर्ष वयोगटातील जान्हवी पवार कमालीची कामगिरी करून दाखवत आपल्या राज्यासाठी चार पदक प्राप्त केले, ते पुढील प्रमाणे आहेत
ओव्हरऑल स्कोरिंग मध्ये 720 पैकी 689 गुण घेऊन भारतामध्ये प्रथम स्थान प्राप्त केले व सुवर्णपदक प्राप्त केले.
मिक्स टीम एलिमिनेशन मध्ये रौप्य पदक प्राप्त, इंडिव्हिजनल ॲनिमेशन मध्ये पाच जणांना हरवून रौप्य पदक प्राप्त केले.आणि टीम एलिमिनेशन मध्ये परत रौप्ये पदक प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे.
जान्हवी पवार ही गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षक सुधीर पाटील ,सुषमा पवार ,मारोती बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे.
या कामगिरीसाठी लातूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे,सचिव अशोक जंगमे,सहसचिव राजेश देवकर ,नवनाथ गरगटे, हनुमंत केसरे यांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या .
त्याचबरोबर क्रीडा प्रेमी भास्कर पाटील ,गजानन पवार, यमुनाजी भुजबळे, सतीश मुरकुटे ,बालाजी केंद्रे , महिंद्र बिरादार ,जिलानी शेख यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!