वाचाव कस हे सांगणार पुस्तक म्हणजे उत्तम वाचक घडविणाऱ्या सात सवयी हे होय. —अमृत देशमुख.
उदगीर (एल.पी.उगीले), मला वाचन करायला वेळच मिळत नाही. वाचलेलं लक्षातच राहत नाही. वाचन करता करता मला डुलकी लागते. कळतच नाही मी खूप हळूहळू वाचन करतो. मी बरीच पुस्तके वाचलीत पण अर्धवटच वाचून सोडलेली आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे उत्तम वाचक घडविणाऱ्या सात सवयी हे पुस्तक होय. असे मत अमृत देशमुख यांनी व्यक्त केले.
बुकलेट गाय म्हणून जगप्रसिद्ध असलेला एक वाचन वेडा तरूण, ज्याने लाखो रुपयांची सीए ची नोकरी सोडून लोकांना वाचते करण्याचा विडा उचलला . ज्याचे नाव अमृत देशमुख असून त्याने व्हाट्सॲप च्या माध्यमातून मिशन मेक इंडिया रीड या चळवळीच्या अंतर्गत लाखो लोकांना वाचते केले. त्यांनी ऑडिओ आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून हजारो पुस्तके लोकांसमोर ठेवली. ज्यामुळे व्हाट्सॲप ने त्यांच्यावर बंदी आणली. तेव्हा त्यांनी स्वतःचा बुकलेट ऍप तयार केले. शेवटी व्हाट्सॲप ने स्वतः माफी मागून अमृतचा व्हाट्सॲप चालू केला. आज साऱ्या जगात ज्याचे 75 लाख फालोअर्स आहेत. स्वतःला पूर्णपणे वाचण्यासाठी वाहून घेतलेल्या ठाणे, मुंबईच्या अमृत देशमुख यांनी चला कवितेच्या बनात अंतर्गत उदगीर येथे चालू असलेल्या 334 व्या वाचक संवाद मध्ये उत्कृष्ट असा संवाद साधून प्रभावित केले.
डॉ. नरेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वाचक संवाद मध्ये अमृत देशमुख यांनी स्वलिखित उत्तम वाचक घडविणाऱ्या सात सवयी या साहित्यकृतीवर संवाद साधून वाचकां मध्ये नवऊर्जा चेतवली. सुरवातीला कु.राही व कु.माही पत्तेवार या दोघींनी गीतेचे श्लोकाचे गायन केले. तर कु. शर्वरी सोमवंशी या विद्यार्थीनीने तीने वाचलेला भाग ऐकवला. यानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. अध्यक्षीय समारोपात डॉ. नरेंद्र शिंदे म्हणाले की जीवनाच्या अंतिम टोकापर्यंत जाऊन परत जीवनाला सुरुवात करायला लावण्याचे बळ हे वाचनामध्ये असून या वाचनासाठी हा वाचक संवाद अविरतपणे चालू आहे. याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे.
या वाचक संवादचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल अजित रंगदळ यांनी करून दिला तर आभार मुरलीधर जाधव यांनी मानले
