रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिली पत्रकार परिषदेत माहीती

अहमदपूर (गोविंद काळे) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा अहमदपूर  शहरालगत (बायपास) जात असून यासाठी जवळपास १५० शेतकऱ्याच्या जमीनी संपादित झाल्या आहेत. शेतकऱ्यांना या जमिनीच्या मावेजापोटी उपजिल्हाधिकारी यांनी खरेदीखता आधारे सरासरी २९०२ रूपये प्रती चौरस मीटर भाव निश्चित करून जिल्हाधिकारी याच्याकडे पाठवला असता संबधित जिल्हाधिकारी यांनी लवादाकडे अपील करून केवळ ६७९ रुपये प्रती चौ.मी.प्रमाणे दर निश्चित करून घोर निराशा केली असून या दरातील तफावतीमुळे  शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतकऱ्यांना संपादीत जमिनीच्या मोबदल्याच्या दराचा फेरविचार करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून त्याचा फेर विचार नाही. केल्यास राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू देणार नाही असा सज्जड इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेल्या निवेदनात त्या अनुषंगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी वार्तालाप करताना शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी प्रा.गोविंदराव शेळके, शामराव भगत, बालाजी बोबडे, नंदकुमार भगनुरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी अपील मध्ये मंजूर केलेला ६७९ हा प्रती चौरस.मीटर दर खूप कमी आहे.संपादीत शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या प्लॉटिंग व हायवे लगत असल्यामुळे हा दर खुपच कमी व अन्यायकारक आहे व तो आम्हास मंजूर नाही. सदरचा दर हा चुकीचे निकष लावून देण्यात आलेला आहे.तालुक्यातील ग्रामीण भागापेक्षाही कमी दर देण्यात आलेला आहे.या संदर्भात २५ नोव्हेंबर २०२० च्या निकालाचा फेर विचार करून मावेजा देण्याची विनंती करण्यात आली आहे आणि जर या निकालाचा फेर विचार नाही केल्यास राष्ट्रीय महामार्गाचे काम सबंधित शेतकरी होऊ देणार नाहीत वेळ प्रसंगी कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर प्रा.गोविंद शेळके, शामराव भगत, बालाजी बोबडे, नंदकुमार भगनुरे,नामदेव सातापूरे,दिनेश भगत, बाबुराव बिलापट्टे, माऊली बिलापट्टे,अनिल फुलारी, सादीक शेख, मुस्ताख बक्षी, सुभाष चेवले, लक्ष्मण चेवले, कैलास भगत, बाबुराव भगत, धर्मराज चावरे, मगदूम पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

About The Author