संभाजी ब्रिगेडने केला सर्व जयंती अध्यक्षाचा सन्मान.

0
संभाजी ब्रिगेडने केला सर्व जयंती अध्यक्षाचा सन्मान.

उदगीर (एल.पी.उगीले) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उदगीर नगरीतील संभाजी ब्रिगेड ने सर्व जयंती अध्यक्षांचा सत्कार केला. स्मृतीचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती उत्सवात सामील होत संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवश्री राजकुमार माने यांच्या विचारातून सर्व पदाधिकाऱ्याना एकत्र घेऊन, एक नवा उपक्रम राबविला आहे. उदगीर नगरीतील सर्व जंयती अध्यक्षचा ट्रॉफी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. जयंती मंडळांना व सर्व भीमसैनिकांना एक वेगळाच आनंद होत होता. संभाजी ब्रिगेड महामानवाच्या विचाराची तलवार तळपत ठेवणार असून, जिल्ह्यातील गोरगरिबांच्या, वंचितांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संभाजी ब्रिगेड करणार आहे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष शिवश्री उतमरावजी फड, जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा संघटक मेहबूब सय्यद,सहसचिव व्यंकट थोरे व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीपजी ढगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेडचे उदगीर तालुका अध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव यांनी केले. सर्वच पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.तालुका उपाध्यक्ष शिवश्री धम्मसागर सोमवंशी, तालुका कार्याध्यक्ष, शिवश्री नरसिंग बनशेलकीकर, शिवश्री सावन तोरणेकर, तालुका सचिव शिवश्री दिपक गायकवाड, तालुका सहसचिव, शिवश्री बंटी घोरपडे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!