संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान व जनजीवनी प्रतिष्ठान तर्फे नैतिक मूल्य शिक्षा योजना पुरस्कार वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) संस्कृती संवर्धन प्रतिष्ठाणच्या वनीने नैतिक मूल्य शिक्षणाची परीक्षा महाराष्ट्रातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेत प्रत्येक शाळेतून जे विद्यार्थी प्रथम , व्दितीय , तृतीय क्रमांक आणि उत्तीर्ण झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र दिले जाते. याचेच औचित्य साधून सादर वल्लभभाई पटेल प्रा . विद्यालया,उदगीर येथे या पुस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे भगवान वट्टमवार हे तर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त नायब तहसीलदार धनेश तांदळे हे होते . प्रमुख उपस्थिती विभाग प्रचारक राजेश सन्यासी , नैतिक शिक्षण योजना प्रांत सहप्रमुख संतोष कुलकर्णी ,दिपक बरसुरकर, मुरलीधर जाधव, मेघशाम कुलकर्णी, विद्यालयाचे सहकार्यवाह उमाकांत बुधे, मुख्याध्यापीका सौ. मंजूषा कुलकर्णी सेमीच्या आशा बेंजरगे आदी उपस्थित होते .
यावेळी या नैतिक शिक्षा योजनेच्या परीक्षेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना मानवरांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. मुख्याधापक,शिक्षक व या परीक्षेसाठी परिश्रम घेतलेल्याना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संयोजक प्रा. श्रीराम चामले, विहिपचे शहर अध्यक्ष महादेव घोणे व मंत्री श्रीपाद करंजीकर हे होते. यासह विहिप जिल्हा सहमंत्री सचिन जनकोटे ,अभिजीत पाटील, बस्वराज डांगे, दिनेश देशमुख,श्रीपाद सिमंतकर, माजी नगर सेवक रामेश्वर पवार व पालक, विद्यालयातील विद्यार्थी , शिक्षक उपस्थित होते . विद्यालयाच्या सेमी विभागाच्या प्रमुख आशा बेंजरगे यांनी आभार मानले, तर सहकार्यवाह उमाकांत बुधे यांनी समारोप केला .
