हिंदू खाटीक समाजा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

0
हिंदू खाटीक समाजा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर येथील हिंदू खाटीक समाजबांधव व नवनिर्वाचित अध्यक्ष हिंदू खाटीक समाज उदगीर भानुदास विठलराव साबणे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना भानुदास साबणे यांनी सांगितले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी आहेत. ज्यांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला.अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. असे सांगून गुलामगिरी प्रवृत्ती बद्दल जनजागरण केले. पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी समाजप्रबोधन केले असे सांगितले.
याप्रसंगी समाजबांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये प्रामुख्याने
रमेश सदानंदे, सुरेश डोंगरे,संतोष खडके, अनिकेत साबणे, सचिन टाके, दीपक साबणे, रवी साबणे,दत्ता साबणे,संदीप साबणे, सुनील डोंगरे, महेश साबणे, अमर टोम्पे, शंकर घोणे, अमर सदानंदे, महेश साबणे, अनिल साबणे,गोविंद साबणे, विलास सदानंदे, बाळू सदानंदे,सचिन सदानंदे, गोविंद साबणे, हिराजी साबणे, गोपाळ कांबळे, किरण साबणे, आनंद साबणे, भरत डोंगरे, वैभव गठ्डे, गौतम गठडे इत्यादींनी जयंती यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!