श्यामलाल हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी

श्यामलाल हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल हायस्कूल मध्ये गुरुचे महत्व सांगणारी गुरुपौर्णिमा व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंग्रजी विभाग प्रमुख संजय देबडवार होते तर प्रमुख उपस्थिती आनंद चोबळे( मुख्याध्यापक श्यामलाल हायस्कूल ), प्रवीण भोळे( मराठी विभाग प्रमुख ) हे उपस्थित होते. प्रवीण भोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचे महत्त्व हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्वाचे आहे, तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षक, गुरु यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे, गुरु म्हणजे केवळ शिक्षकच नाही तर जीवनाच्या विविध टप्प्यावर आपल्या अज्ञानाची जाणीव करून देणारे व आपल्या ज्ञानात भर घालणारे लहान-मोठे सर्वच गुरुस्थानी असतात असे मत व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जहाल मतवादी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य टिळकांच्या कार्याची माहिती सर्वांना दिली. अध्यक्षीय समारोपात संजय देबडवार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या व यापुढेही ज्ञानदानाचे पवित्र कार्य आपल्या हातून अविरतपणे घडो अशा शुभेच्छा दिल्या. गुरु चे महत्व दर्शवणारे गीत गायन सुनील बागडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रमोद कावरे यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापक आनंद चोबळे व संस्कृत विभाग प्रमुख प्रमोद कावरे यांनी शिक्षक बंधू-भगिनींचा पुष्प देऊन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author