पहलगाम येथे झालेल्या घटनेच्या उदगीरात निषेध

उदगीर (एल पी उगिले) शहरातील मुस्लिम समाजाने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेध करण्या करता शुक्रवारी नमाज पठण करताना काली पट्टी बांधून नमाज अदा केले.व नमाज सुटल्यावर पहलगाम जम्मू कश्मीर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेध व हल्ल्यामध्ये मयत झालेले सर्वांना श्रद्धांजली देण्यात आली. भारत जिंदाबाद, अतिरेक्यांना फाशी द्या अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळेस जन परिवर्तन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख, शेख इलियास, शेख मनोद्दीन, हाश्मी सलीम, जागीरदार इमरान, शेख नदीम, शेख पाशा, मुस्ताक शेख नाझीम, शेख इस्माईल, पठाण इरफान सय्यद, फिरोज, शेख हिसामुद्दीन, बागवान लतीफ, बागवान रेहान यांच्यासोबत हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.