श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर

उदगीर (एल पी उगिले)
अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा बाल संस्कार केंद्र (दरबार) श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त व 1 मे 2025 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरु पुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 26- 4- 2025 वार शनिवार या दिवशी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा बाल संस्कार केंद्र श्रीरामचंद्र नगर नांदेड रोड उदगीर या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ उदगीर शहर, तालुक्यातील, परिसरातील देवणी, जळकोट तालुक्यातील, सीमा भागातील नागरिकांनी सहभाग नोंदवून राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे. असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरासाठी पूर्ण नाव नोंदणी आवश्यक आहे.
संपर्क मोबाईल क्रमांक -9356592965,8208142173,9623460979.