30 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवाचे आयोजन

उदगीर(एल.पी.उगिले) प्रतिवार्षा प्रमाणे 30 एप्रिल रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येणार आहे.
वीरशैव समाज व हावगीस्वामी युवक मंडळ यांच्या विधमाने 29 एप्रिल रोजी श्री हावगीस्वामी मठ या ठिकाणी रक्तदान शिबीर व सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचे उदघाटन प. पू. ष. ब्र. 108 श्री. डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहयोग बँकेचे चेअरमन रमेश आबरखाने हे राहणार आहेत.
30 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता वीरशैव समाज या ठिकाणी ध्वजवंदन जयंती समितीचे अध्यक्ष प्रमोद संग्रामप्पा शेटकार यांच्या हस्ते होणार आहे. संग्राम शाळांचे मुख्याध्यापक अगंद हक्के यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन होणार आहे. सकाळी 8:30 वाजता बसवणकेरी या ठिकाणी बस्व ध्वजावंदन श्रावण बागबंदे यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रतिमेचे पुजन राजकुमार मरनगे हे करणार आहेत.9 वाजता महात्मा बस्वेश्वर चौक रेल्वे स्टेशन या ठिकाणी बसव ध्वजवंदन बाजार समितीचे प्रभारी सभापती प्रिती भोसले याच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रतिमेचे पुजन माजी सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटीत मलकापूरकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बाजार समितीचे संचालक विजय निटुरे, वसंत पाटील, रविंद्र कोरे इ उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९: ३० वाजता नगर परिषद या ठिकाणी बस्व ध्वजवंदन आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रतिमा पुजन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांचा हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे माजी आ. मनोहर पटवारी, चंद्रकांत वैजापुरे, राजेश्वरराव निटुरे, शिवाजीराव हुडे, बस्वराज बागबंदे, बस्वराज पाटील कौळखैडकर, श्रीमती रेखा कानमंदे, मनोज कपाळे, अमोल निडवदे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता महात्मा बसवेश्वर प्रवेशद्वार बिदर रोड या ठिकाणी प्रतिमा पूजन वीरशैव समाजाचे कोषध्यक्ष सुभाष धनुरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रभूआप्पा बिरादार, विजयकुमार चवळे, सुरज घाळे हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11:30 वाजता बसवणकेरी गल्ली या ठिकाणी महात्मा बसवेश्वर पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी छाया बागबंदे ,श्रीमती लक्ष्मीताई पांढरे,प्रभावती आलमकेरे, विद्यावती हुसाळे, व राष्ट्रीय बसव दल, उदगीर व शहरातील सर्व भजनी मंडळ उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर सायंकाळी 4 वाजता उदघाटन प. पू. ष. ब्र. 108 श्री. डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या सानिध्यात उदगीर शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे.
तरी तालुकातील व परिसरातील बसवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन विरशैव समाज महात्मा बसवेश्वर जयंती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.