पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगिले) उदगीर तालुक्यातील मौजे तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन करत, उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेल अशी परंपरा निर्माण केली आहे.
सन 2024 – 25 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या द्वारे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत, शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थीही गुणवत्तेमध्ये कुठे कमी नाहीत. ही बाब पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये संग्रामपटले आदिती महादेव, सुकणे नंदिनी नागनाथ, चव्हाण गणेश गुरुनाथ, सूर्यवंशी अंकिता देविदास या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकाचे कपिलेश्वर ज्ञानप्रसारक भगिनी मंडळ तोगरी या संस्थेच्या अध्यक्षा सौ. शांतम्मा पाटील, सचिव श्रीमती इंदुमती मनोहरराव येरनाळे, कार्याध्यक्ष महेश मनोहरराव येरनाळे, प्राचार्य सौ. वंदना महेश येरनाळे, उपप्राचार्य गुणवंत काळगापुरे, पर्यवेक्षक लक्ष्मण लोभाजी व विद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संपूर्ण तालुक्यातून होत आहे.
