डॉ.ह.वा.कुलकर्णी यांची वाणिज्य शाखेतील लेखा आणि प्रायोगिक सांख्यिकी या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

उदगीर (एल पी उगिले) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ह.वा.कुलकर्णी यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वाणिज्य शाखेतील लेखा आणि प्रायोगिक सांख्यिकी (अकाउंट्स आणि अप्लाइड स्टेटस्टिक) या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहरजी चासकर, प्रकुलगुरु डॉ. अशोकजी महाजन, अध्यक्ष स्थायी समिती,अध्यक्ष आणि सर्व सन्मानीय सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.डॉ कुलकर्णी यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलेले आहे. विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय मासिकातून त्यांचे संशोधन पर लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी मिळालेली आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. या निवडीबद्दल त्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर ,सचिव पी टि शिंदे ,कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे ,
प्राचार्य डॉ.वसंत भोसले, उपप्राचार्य डॉ.आर व्ही.घाडगे ,संजय अग्रवा,ल संभाजी जाधव ,डॉ.नवले अरविंद, सिनेट सदस्य डॉ.विष्णू पवार,डॉ नरसिंग कदम,डॉ.लक्ष्मण पाटील,डॉ. कोणाळे डी.बी., डॉ. गायकवाड व्ही.डी., डॉ.डी.बी मुळे,डॉ.बिरादार आर.पी.,डॉ.नेहाल खान, डॉ.तिरपुडे एच.ए., डॉ चाटे एस,डॉ. उर्मिला शिरशी,प्रबंधक बालाजी पाटील, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.