करडखेल येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न

उदगीर (एल पी उगिले) लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशाने उदगीर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या अधिपत्याखाली व उदगीर तालुक्याचे तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तालुक्यातील करडखेल येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा उद्देश शासनाच्या विविध योजनेची माहिती व शासनामार्फत राबविण्यात येणारे नवीन नवीन तंत्रज्ञान अभियान याचा सर्व सामान्यांना लाभ मिळावा, व विविध योजने पासून वंचित असलेल्या तळागाळातील लोकापर्यंत हा संदेश देऊन त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी गाव पातळीवर माहिती देणे, तसेच विविध दाखल्याचे वाटप करणे, मयत खातेदाराच्या नावावरील सातबारा जिवंत करणे. शेतकरी यांच्यासाठी फार्मर आयडी काढून देणे, संजय गांधी योजना ,इंदिरा गांधी योजना इत्यादी योजनेतील लाभार्थीची इकेवायसी करून लाभार्थ्याच्या डायरेक्ट खात्यावर लाभ जमा करणे. प्रधानमंत्री किसान योजना यात काही अडचणी असल्या तर त्या ग्राम पातळीवर दूर करणे, शेतकरी यांच्या प्रगतीसाठी गाव नकाशावरील रस्ते खुले करून अडथळा दूर करणे, तलाव गाळ मुक्त करण्यासाठी शासनातर्फे शेतकरी यांना मदत करण्यात येणार आहे. अशा अनेक योजनाची माहिती महसूल विभाग ग्रामविकास विभाग तसेच कृषी विभाग यांच्यामार्फत शेतकरी यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांना विविध योजनेची माहिती दिली. या शिबिराचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन उदगीरचे नायब तहसीलदार विलास सोनवणे यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली. हेर विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी प्रस्ताविकात शासनाच्या सर्व योजनेची माहिती उपस्थित शेतकरी व गावकरी यांना दिली. ग्रामविकास खात्यामार्फत राबविण्यात येणारे योजनेची माहिती ग्राम अधिकारी प्रल्हाद कानुरे यांनी दिली. कृषी विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती संजयसिंह चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी संतोष पाटील व अंकुश वडगावे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मंडळ विभाग हेर मधील ग्राम महसूल अधिकारी अनुराधा अलगुले, सावन उळागड्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यमान सरपंच पार्वती मुसने, उपसरपंच गिरीश राघू, माजी सरपंच दिलीप निडवंचे, माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ता नामदेव मुळे, पोलीस पाटील एकनाथ कसबे, चेअरमन शिवाजीराव निडवंचे, संदीप पांचाळ दत्ता, पवार विनायक, बुरले रसूल, तांबोळी विकास, मुडबे गुरुनाथ, राघू वैजनाथ, कमठाने मधुकर, कांबळे मनोहर, कसबे पंडित, बजगिरे दत्ता, होनाळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शेवटी ग्राम महसूल अधिकारी अंकुश वडगावे यांनी सर्वाचे आभार मानले.