पोतणे तुळशीदास यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

उदगीर (एल पी उगिले)
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्रा. वि.) लातूरच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गुरु गौरव पुरस्कार चंद्रकला देवी पाटील माध्यमिक विद्यालय उदगीर येथील सहशिक्षक शिक्षक पोतणे तुळशीदास यांना जाहीर झाला होता. त्या पुरस्काराचे वितरण थाटामाटात संपन्न झाले. होते तुळशीदास यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पोतणे तुळशीदास व त्यांच्या पत्नी सौ.सारीता पोतणे या दोघांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक गुरु गौरव पुरस्कार देऊन दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहांमध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एक उत्कृष्ट सहशिक्षक’ मेहनती व्यक्तिमत्व, विद्यार्थीप्रिय शिक्षक,प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य ,तसेच विविध क्षेत्रात योगदान देऊन ते सतत कार्यरत असतात.
त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेचे सचिव प्रा. डॉ. राजेश्वर पाटील प्रा. सौ. सुनीताताई पाटील, प्रा.बाबुराव जीवने संजय हत्ते, धनराज रिक्के, शाळेतील शिक्षक खिंडे उमाकांत, तोंडारे के.ई,सौ. अनिता बिरादार ,सौ. ज्योती रेड्डी, गीते रविकिरण , सौ. उळागडे आशा, सौ. शोभा बिरादार,सौ. सूर्यवंशी ललिता,सौ अनुराधा गळगे,सौ उषा हत्ते, यमगर रामदास, चाळकापुरे एस व्ही, स्वामी बी.पी,निहाल गुरुडे,सौ कांबळे मंगल , सुनील कारभारी, चव्हाण जितेंद्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व रामकृष्ण पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अरविंदजी पत्की व रामकृष्ण पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.