छाया’ चित्रपट दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्काराने सन्मानित

लातूर (प्रतिनिधी) : ११ वे नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा मराठी फिल्म आणि टेलिव्हिजन पुरस्कार नाशिक मध्ये नुकताच पार पडला. यात देश विदेशातील चित्रपट, दिग्दर्शक आणि कलाकारांचा सुद्धा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला. तसेच लातुर येथील चित्रपट दिग्दर्शक सुमित तिकटे यांचा ही छाया नावाचा चित्रपट या फेस्टिवल मध्ये सहभागी झाला होता. अनाथांची आई सिंधुताई सपकाळ याच्यां विचारावर भाष्य करनारा हा चित्रपट सर्वांच्या मनाला हेलावून टाकण्यात यशस्वी ठरला. छाया चित्रपटाचे ऑफिशली सलेक्शन झाले आणि जुरी स्पेशल फिल्म म्हणून छाया चित्रपट सर्वांन समोर प्रदर्शित सुद्धा करण्यात आला.
अतिशय कमी वयातील दिग्दर्शक सुमित मारोती तिकटे म्हणून नाशिक मध्ये छाप पडली. हे लातुर करांसाठी अभिमानास्पद आहे. लातुर नगरीत एका तडपदार तरूण दिग्दर्शकाची गरूड झेप अगदी उंच ठरली. सुमित तिकटे यांनी आशा फिल्म्सद्वारा खाडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच नेताजी शिवाजी साळुंके, उपसरपंच देवानंद अभिनंदन जाधव यांच्या सहकार्याने चित्रपटाचे चित्रीकरण खाडगाव मध्ये पूर्ण केले होते.
छाया चित्रपट दिवसेंदिवस मोठा व्हावा आणि सिंधुताई सपकाळ यांचे विचार अनंतकाळापर्यंत आपल्या समाजामध्ये टिकून राहावे आणि छाया चित्रपटाच्या कलाकारांनी आणखीन उंची गाठावी यासाठी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सुमित तिकटे व सर्व कलाकार मंडळींचे कौतुक होत आहे.