शास्त्री विद्यालयातील नीता मोरे व राहुल नेटके आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सन्मानीत

उदगीर (एल पी उगिले) येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका नीता मोरे व राहुल नेटके यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्काराचा वितरण सोहळा लातूर येथील दयानंद सभागृहामध्ये पार पडला. पुरस्काराचे वितरण खा. शिवाजीराव काळगे,उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी,डायट प्राचार्या भागीरथी गिरी, माजी आ. बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नीता मोरे या नवोपक्रमशील, साहित्यिक व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून शालेय क्षेत्रात ओळखल्या जातात. त्यांनी विद्यार्थ्यांना पूरक अशी साहित्य निर्मिती केली व गणितातले वेगवेगळे प्रयोग करुन विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे कार्य केले. तसेच विज्ञान शिक्षक राहुल नेटके हे प्रयोगाशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा सहभाग, संशोधन प्रयोगशील वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम सातत्याने करीत राहिले. या दोन्ही शिक्षकांचा शिक्षणाक्षेत्रातील अध्यापन अनुभव व वैविध्यपूर्ण अध्यापनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या दोघांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले.
याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह हेमंत वैद्य ,मुख्य प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार ,कार्यवाह शंकरराव लासुणे, शालेय समितीचे अध्यक्ष सतन्पा हुरदळे, मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, माधव मठवाले ,किरण नेमट व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.