डॉ. बाबासाहेबांचे अथांग सागरासारखे विचार समाजाला दिशा देतात – राम बोरगावकर

उदगीर (एल पी उगिले)
विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग विचाराची जगभर पूजा केली जात आहे. संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशात श्रद्धेय समजली जाणाऱ्या व्यक्तीचे विचार जगाला दिशा देत आहेत. दुर्दैवाने काही लोक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संकुचित करण्यासाठी त्यांच्या विचारांना मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रकांड पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेची झलक दाखवत जगात सर्वश्रेष्ठ अशी भारतीय राज्यघटना लिहिली आहे. त्यांचे व्यापक विचार जर स्वीकारले तर समाजाला दिशा मिळू शकेल, असे विचार तहसीलदार राम बोरगावकर यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील मौजे हंगरगा येथे जेतवन बुद्ध विहार समिती व प्रबुद्ध समाज संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीत मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जेत्वन बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष मनोहरराव कांबळे, उदगीरच्या माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे तसेच श्रीहावगीस्वामी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संजय शिंदे, धम्म गोष्टीचे पदाधिकारी विद्यासागर डोरनाळीकर, सेवानिवृत्त न्यायाधीश भाले, जाधव तसेच आरपीआयचे नेते देविदास कांबळे, संयोजक ख्यातनाम दंत चिकित्सक डॉ. गोविंद सोनकांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राम बोरगावकर म्हणाले की, समाजाला एकसंघ ठेवायचे असेल तर समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही त्रिसूत्री खऱ्या अर्थाने स्वीकारणे गरजेचे आहे, असेही सांगितले.
याप्रसंगी बोलताना प्रवीण सुरडकर यांनी बाबासाहेबांचे विचार कसे व्यापक आहेत, समाजातील सर्व घटकांना जोडणारे आहेत. या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. जेतवन बुद्ध विहार समितीच्या वतीने उदगीर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी भीम गीत गायन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, नाटिका स्पर्धा, भाषण स्पर्धा, नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत विविध गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकही देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र शिंदे, दयानंद शिंदे, दिलीप कांबळे, जयंती महोत्सवाच्या यशस्वीते साठी प्रबुद्ध समाज संघाचे पदाधिकारी दिलीप कांबळे, अर्जुनराव कांबळे, दिलीप गायकवाड, डॉ. माधव बुकटे, अतुल ससाने, श्याम सूर्यवंशी, जयराम कोकाटे, राजेश्वर कांबळे, प्रशांत कांबळे, सिद्धेश्वर तलवारे, डॉ. गौतम कांबळे, लालबहादूर रानडे, माजी नगरसेवक श्रीरंग कांबळे, विलास कांबळे, माधव कांबळे, चंद्रकला कांबळे, पंढरी गव्हाणे, प्रदीप कांबळे, पंढरीनाथ वायगावे, मनीषा डोरनाळीकर, डॉ. सांची कांबळे, घोरपडे ताई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सांची कांबळे यांनी प्रास्ताविक पर भाषणातून या स्पर्धा नियोजनाचे आणि एकूण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सविस्तर असे प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश्वर कांबळे यांनी केले.
जेतवन बुद्ध विहार स्थापनेसाठी संस्थापक मनोहर कांबळे यांनी स्वखर्चाने ही भव्य दिव्य वास्तू उभा केली, इतकेच नाही तर प्रत्येक वेळी विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजातील उपेक्षितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. याबद्दल उपस्थि तांनी मनोहरराव कांबळे यांचे अभिनंदन केले.