वाढवणा महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न

उदगीर (एल पी उगिले) शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी सोडवणे तसेच कागदपत्राच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करणे या उद्देशाने गावोगावी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर महसूल मंडळ विभाग वाढवणा बु अंतर्गत तलाठी सज्जा वाढवणा बु येथे आयोजित करण्यात आले होते . उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान शिबिराचे आयोजन करून या शिबिरामध्ये वाढवणा गावचे सरपंच नागेश थोनटे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सातबारा,शिधा पत्रिका, ऍग्री स्टॅग, शेतकरी फार्मर आयडी प्रमाणपत्र यांचे वाटप करून ,सध्या महाराष्ट्र शासनाकडून चालू असलेल्या नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना जसे की, संजय गांधी निराधार योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना तसेच पालकमंत्री शेतकरी पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त योजना , जन्म मृत्यू दाखले प्रमाणपत्र या बाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे जिवंत सातबारा,फार्मर आयडी,शिधापत्रिकांचे ई के वाय सी करणे, पीक पहाणी याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावात रस्त्यासाठी वादविवाद चालू असलेला वहिवाटीचा रस्ता आपसापसात सामंजसपणाने मिटून घेण्याबाबत स्थळ पहाणी करून वाद मिटवण्यात आला. तसेच मातंग समाज समशानभूमीसाठी जाणाऱ्या रस्त्याची ही स्थळ पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी गणेश हिवरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, तसेच उपसरपंच,चेअरमन गावातील बाळू काळे, दत्ताजी बामणे, अन्वर हवलदार, प्रतिष्ठित नागरिक,शेतकरी व वाढवणा बु मंडळातील ग्राम महसूल अधिकारी आकाश आलुरे, तानाजी शिंदे, कुलदीप गायकवाड, परशुराम जणतीने ,बालाजी नागरगोजे हे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या या नावीन्यपूर्ण योजना छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर घेतल्यामुळे शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.