छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

0
छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

उदगीर (एल पी उगिले) छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एम. मांजरे यांनी महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांनी 12 व्या शतकात जात निर्मूलन, सामाजिक सुधारणा, साहित्य निर्मीती करून समाज परिवर्तनाचा विचार लोकांपर्यंत पोहचवला. अनुभव मंडपाची स्थापना करून लोकशाहीचा पाया घातला. त्याचबरोबर 19 व्या शतकातील आधुनिक संत तुकडोजी महाराज यांनी भजनावळी किर्तन प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधनाचा विचार लोकांमध्ये रुजवला. ग्रामगीता हा ग्रंथ लिहून सामाजिक रचनेचा पाया घातला .असे मत डॉ.मांजरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समिती प्रमुख प्रा. डॉ. सुरेश शिंदे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. डी. बी. मुळे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!