महात्मा बसवेश्वरांनी समाजात समतेचा विचार रुजविला – आ. संजय बनसोडे

0
महात्मा बसवेश्वरांनी समाजात समतेचा विचार रुजविला - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले): महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जातिव्यवस्थे बरोबर अंधश्रद्धा इतर वाईट गोष्टींविरुद्ध संघर्ष केला.स्त्री – पुरुष समानता , उच्च-नीच भेदभाव नष्ट करण्यासाठी लढा उभारला. अनुभव मंटपाच्या माध्यमातून पहिल्या लोकसंसदेची बिजे रोवली. समाजात समतेचा विचार रुजविला म्हणून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण सर्वांनी जीवनाची वाटचाल करावी, असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील नगर परिषदे समोरील प्रांगणात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त बसव ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी माजी आ.मनोहर पटवारी, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, उषा कांबळे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद शेटकार, बाजार समितीच्या सभापती प्रीती भोसले, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, सुभाष धनुरे, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, बाबुराव पांढरे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानी मियाँ, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, अनिल मुदाळे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मनोज पुदाले, भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, सुभाष धनुरे, उध्दव महाराज हैबतपुरे, कुणाल बागबंदे, अॅड. महेश मळगे, साईनाथ चिमेगावे, अमोल निडवदे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, नवनाथ गायकवाड, मधुमती कनशेट्टे, उर्मिला वाघमारे, अनिता बिरादार, शांतवीर मुळे, समीर शेख, कुणाल बागबंदे, मंदाकिनी जिवणे, हुस्ना बानो, अनिता बिरादार, शशिकला पाटील, बालाजी गवारे, पप्पु गायकवाड, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, व्यंकट बोईनवाड, नरसिंग शिंदे, श्रीकांत पाटील, रुपेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे जात, सामाजिक स्थिती या गोष्टींचा विचार न करता सर्व लोकांना समान संधी देत जिवनात परिवर्तन घडुन आणले .अनुभव मंटपात सर्व जातीधर्मातील शरण सहभागी होते. त्याचे वचन साहित्याच्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. काम हेच ईश्वर मानुन श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली.
मागील काळात जळकोट येथे जगतज्योती म.बसवेश्वरांचा पुर्णाकृती पुतळा उभारला, उदगीर व जळकोट येथे लिंगायत भवनची निर्मिती केली. भविष्यात ही समाजातील सर्व प्रश्न सोडवणार असुन येत्या काळात समाजाच्या मागणीचा विचार करुन बसव भवन उभारणार असल्याचेही आ.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजातील प्रतिष्ठित नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!