बहुजन विकास अभियानच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्य अभिवादन

उदगीर (एल पी उगिले) जगातील पहिल्या लोकशाही निर्मक अनुभव मंडप परंपरेच्या आणि दायित्वतून माझ्या माय माऊलींना मुक्त करणारे, स्त्री उद्धारक, समतेची पताका जगाच्या पाठीवर गाजवणारे, युग प्रवर्तक न्यायासाठी गणाचाराचा वापर करण्यास सांगणारे, ज्ञानाचा दीप प्रज्वित करून सर्वांना ज्ञान देणारे, अशा महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सर्वांनी त्यांना अभिवादन करून, त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन अभियान प्रमुख संजय कुमार यांनी यावेळी केले. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, अमोल सूर्यवंशी, रवी डोंगरे, शंकर सपनोरे, शत्रुघन वाघमारे, गोरख वाघमारे, अंबादास पाटील, गंगाधर शेवाळे, सुनील पाटील, शेख सरवर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.