श्रीमती मृदुला पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित.

उदगीर (एल पी उगिले) येथील
विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका श्रीमती मृदुला विजयकुमार पाटील यांच्या राष्ट्रीय,शैक्षणिक , सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हास्तरीय ‘आदर्श गुरु गौरव ‘व अहिल्याबाई होळकर पुण्यस्मरणानिमित्त आदर्श ‘उपक्रमशील शिक्षिका ‘ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार लातूर येथील दयानंद सभागृहात संपन्न झाला.लातूर मतदार संघाचे खा. डॉ. शिवाजीराव काळगे,उमरगा मतदार संघाचे आ. प्रवीणजी स्वामी , डायटच्या प्राचार्य भगीरथी गिरी तसेच अहमदपूरचे माजी आ. बब्रुवानजी खंदाडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मधुकर उन्हाळे, राज्याध्यक्ष शिक्षक परिषद मच्छिंद्र गुरमे, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद सुरेश दंडवते, राज्य संघटक मंत्री शिवाजीराव माने, जिल्हाप्रमुख शिवसेना या मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मृदुला पाटील यांच्या समवेत वडील प्राचार्य विजयकुमार पाटील तसेच त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. तसेच विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हणमंते, जाधव आणि शिक्षक सहकारी, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.त्याच बरोबर संस्थेचे अध्यक्ष व सचिव, सर्व कार्यकारी संचालक यांनी सुद्धा कौतुक आणि अभिनंदन केले.