उदगीर रोटरीच्या वतीने शाळकरी मुलांसाठी उद्योजकता रायला संपन्न.

उदगीर (एल पी उगिले) येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने तालुक्यातील मादलापुर शिवारातील ग्लो फूड्स या कारखान्यास शहरातील माउंट लिटरा झी स्कुलच्या १५० विद्यार्थ्यांना घेवून जावून भेट घडवून आणली.
यावेळी माउंट लिटरा झी स्कुलच्या इंटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. या भेटीतंर्गत ग्लो फूड्सचे मालक शुभम जाधव यांनी त्यांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या चॉकलेट, जाम, सॉस, लोणचे आदी वस्तूंच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उदगीर रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन विद्या पांढरे, संतोष फुलारी, अभिजित पटवारी सह माऊंट लिटरा झी स्कुलचे प्राचार्य सुर्यकांत चवळे, उपप्राचार्य कल्पना चौधरी व आदर्श गुप्ता, सचिन घोळवे, अनिल बालूरकर, रिझवाना काझी, अंजना जगदाळे आदी शिक्षक उपस्थित होते.