प्रा.डॉ. मदन शेळके आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
प्रा.डॉ. मदन शेळके आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल पी उगिले) येथील
कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. मदन शेळके यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने 2025 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात गेली अकरा वर्षे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करणारे प्रा.डॉ.मदन शेळके यांनी महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विषयावरती अनेक राष्ट्रीय परिषदेचे अतिशय व्यवस्थितरीत्या आयोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात, पालकांशी सुसंवाद ठेवणे, महाविद्यालयामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवणे तसेच प्रा.डॉ. मदन शेळके यांनी सिद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करणे,व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणे.या संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळांना शाळा डिजिटल करण्यासाठी वेळोवेळी आर्थिक मदत करणे अशा विविध सामाजिक कार्यात त्यांचा हिरहिरीने सहभाग असतो. सामाजिकतेची जाणीव ठेवून रक्ताची आवश्यकता असणाऱ्या अनेक रुग्णासाठी सोळा वेळा रक्तदान केले आहे. प्रा.डॉ.मदन शेळके यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची नोंद घेऊन राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कै. बापूसाहेब एकंबेकर सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.विजयकुमार पाटील , प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!