धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर येथे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा.

0
धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर येथे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा.

उदगीर(एल पी उगिले):- धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील यांच्या हस्ते भारतीय तिरंगा ध्वजारोहण व राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रतिमा पूजन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील यांनी भारताच्या स्वातंत्र्या नंतर देशभरात भाषावार प्रांतरचनेची चळवळ 1950 च्या दशकात सुरु झाली. यामध्ये मुंबई सह महाराष्ट्र निर्मिती या मराठी भाषिकांच्या एकता,गौरव व अस्मिता यासाठी काढण्यात आलेल्या विविध आंदोलन व मोर्च्यामध्ये 105 लोकांनी प्राणाची आहुती(बलिदान)दिले.तत्कालीन बॉम्बे राज्याची दोन भागात विभागणी होऊन मराठी भाषिक महाराष्ट्र आणि गुजराती भाषिक गुजरात ही दोन नवीन राज्य 1 मे 1960 रोजी निर्माण झाली याची सविस्तर माहिती दिली. तथा 1 मे हा दिवस जागतिक श्रमिक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्याचे महत्व विषद केले.या प्रसंगी डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.सायराम श्रीगिरे,डॉ.पुष्पा गवळे,डॉ.रविकांत पाटील,डॉ.स्नेहल पाटील,डॉ योगेश सुरनर,डॉ.प्रशांत बिरादार,डॉ उषा काळे, डॉ शीतल घोरबांड, डॉ.विष्णुकांत जाधव,डॉ.प्रवीण बलूतकर,डॉ किरण मुळगीर,डॉ.प्रीती पतंगे,डॉ.स्वप्नील बिरादार यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी तथा शिक्षकेत्तर-रुग्णालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!