डोंगरज जि. प. शाळेत महाराष्ट्र दिन व सत्कार समारंभ साजरा

0
डोंगरज जि. प. शाळेत महाराष्ट्र दिन व सत्कार समारंभ साजरा

डोंगरज / प्रतिनिधी : येथील जि. प. प्रा. शाळेत 1 मे दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.ध्वजरोहण मुख्याध्यापक एन. आर. शेख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेचे विद्यार्थी इय्यता 5 वी वर्गातील यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीने अन्वी वारद, आरोही मुंढे, महंमदखान पठाण, मेहराज हाडोळतीकर, अविनाश ढवळे, सृष्टी माने, नेहा मोमीन, यश कोलेवाड या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शालेय व्य. समिती, शिक्षण तज्ञ यांचा मन्मथ अप्पा वारद यांच्या कुटुंबियां कडून सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील काही शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. आरोग्य विभाग, पशु संवर्धन विभाग, तसेच ग्रामपंचायतचे सरपंच ललिता कैलवाडे, बळीराम कांबळे, दत्ता जाधव, दत्ता शिंदे, दत्ता खपरले, गोविंद देवणे, ग्रामसेवक माधव सूर्यवंशी, डॉ. श्रीमती मुंढे, डॉ. गाडेकर, अंगणवाडी ताई, आशा वर्कर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एन. आर. शेख, बंडेवार, फड, जाधव एन. आर., जाधव बी
व्ही., श्रीमती पांचाळ, श्रीमती दमकोंडवार, श्रीमती स्वामी, श्रीमती दंडे व नंदू मामा इत्यादीनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!