उदयगिरीत प्रा. डॉ. मल्लेश झुंगा स्वामी यांचा सेवा गौरव संपन्न

0
उदयगिरीत प्रा. डॉ. मल्लेश झुंगा स्वामी यांचा सेवा गौरव संपन्न

उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक विभागातील प्रा. डॉ. मल्लेश झुंगा स्वामी यांचा नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने सपत्निक सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य आर. के. मस्के यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर, प्रा. प्रवीण जाहुरे, प्रा. डॉ. आर. बी. अलापुरे, प्रा. एस. एन. लांडगे, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. हमीद अश्रफ, प्रा. डॉ. व्ही. पी. पवार, प्रा. एस. जी कोडचे यांनी प्रा. स्वामी यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्रा. स्वामी म्हणाले, उदयगिरी महाविद्यालयाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न केला. अध्यक्षीय समारोपात मानकरी म्हणाले, मल्लेश स्वामी यांच्या कार्याने समाजात महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, सहसचिव अ‍ॅड. एस. टी. पाटील चिघळीकर संस्था सदस्य प्रा. मनोहर पटवारी, महादेव नौबदे, शिवराज वल्लापुरे, प्रशांत पेन्सलवार, सुभाष धनुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक एस. व्ही, मुडपे आणि टी. एन. सगर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. पी. मोरे तर आभार प्रा. एस. टी. कांबळे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!