संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्व रोग निदान व रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल पी उगिले) जगदज्योति महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवा निमिताने संभाजी ब्रिगेड व लैब आशोसियनच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या सर्व रोग निदान तपासणी व रक्त दान शिबिर कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी पार पडला.
जगदज्योति महात्मा बसवेश्वर जंयतीचे औचित्य साधुन संभाजी ब्रिगेड व लैब आशोसियनच्या वतीने सर्व रोग निदान तपासणी व रक्त दान शिबर यशस्वी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन स्त्री रोग तज्ञ व सर्जन डॉ. जगदीश येरोळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे जयवंतराव पाटील, डॉ. लखोटिया, डॉ. पांडुरंग दोडके, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. प्रशांत चोले, डॉ. दत्ता पाटील, महात्मा बसवेश्वर जयंती चे अध्यक्ष प्रमोद शेठकार उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती ज्यामध्ये डॉ. बिराजदार, डॉ. दर्शन बेग, मधुमेह ह्रदयरोग तज्ञ डॉ. चित्रा गंध कोतले, स्त्री रोग तज्ञ डॉ. अभिजीत वानखेडे, सर्जन डॉ. शुभांगी शिंदे वानखेडे, बालरोग तज्ञ डॉ. अभय देशपांडे, डॉ. काळे आयुर्वेद तज्ञ डॉक्टर संदीप सोनटक्के तंत्ररोग डॉ. विजय बिरादार, औषधी दाते सत्यवान बोरुळकर, श्रीराम नवटके, श्री धनाजी मुळे हे होते.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या प्रमाणे गोरगरिबासाठी मोफत रोग निदान तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करून, समाज सेवेची संधी उपलब्ध करून घेतली आहे. सेवा करण्याची जिद्द असेल तर कोणत्याही क्षेत्रातून समाजसेवा केली जाऊ शकते, असे उदाहरण समाजपुढे संभाजी ब्रिगेडने करून दाखवलेले आहे. या मध्ये गोरगरीब लोकांनी आपल्या रक्ताची तपासणी, सिटीस्कॅन, शुगर, थायरॉईड, नेत्र तपासणी, अस्थी तपासणी, बालरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, दंत रोग तपासणी करून घेऊन ग्रामीण तसेच शहरी भागातून लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच तरुणांनी रक्तदान केले. राधाई ब्लड बँकेस जमा करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माने , संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष उत्तमरावजी फड, जिल्हा संघटक मेहबूब सय्यद, फोटोग्राफर संतोष गुंगेवाड,तालुका अध्यक्ष राजकुमार भालेराव, माजी विधानसभा अध्यक्ष देवाघंटे,तालुका उपाध्यक्ष धम्म सागर सोमवंशी,तालुका सचिव सावन तोरणेकर,तालुका सहसचिव दीपक गायकवाड, तालुका संघटक सुरज आटोळकर,तालुका संघटक बंटी घोरपडे,तालुका संघटक भगवान चौधरी, तुकाराम कांबळे,शशिकांत गायकवाड , आनंदराव भोपणीकर, नागेश कांबळे,लॅब असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर,
ओम बोळेगावे, रामेश्वर फुलारी, तुषार मुंडे, रुपेश रत्नावार व लातूर येथून आलेले तसेच उदगीर येथील सेवक व सेविका यांनी आपले कर्तव्य पार पाडले पार पाडले. या कार्यक्रमास बाळासाहेब चिंचोलकर यांचे विशेष योगदान राहिले. या यशस्वी झालेल्या सर्व रोग निदान शिबिरात संभाजी ब्रिगेडच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.