बाल संस्कार शिबिरातील शिबिरार्थींना दीपक बलसुरकर यांनी कथाकथना च्या कार्यक्रमातून मंत्रमुग्ध केले

उदगीर (एल पी उगिले) चिन्मय मिशन अंतर्गत आयोजित बालसंस्कार शिबिरात शालेय मूला मुलीसमोर कथाकथन करताना अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचे माजी प्रमुख कार्यवाह ग्रंथ मित्र दीपक बलसूरकर यानी कथाकथनाच्या माध्यमातून शिबिरार्थीना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी पूज्य साने गुरूजीचे खरा तो एक चि धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थना गीताने सुरवात करून प्रेरणागीत, प्राणी कथा, बैठे खेळ ईत्यादी माध्यमातून संस्कारक्षम गोष्टी सांगून मुलांच्या मनावर प्रभावीपणे संस्कार अनूकरणीय आहेत. हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. स्वर्गात आकाश गंगा हे गीत साभिनय सादर करून मुलांचाही सहभाग घेतला. शेवटी आभाळाची आम्ही लेकरे वसंत बापट यांचे गीत घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. हे बालसंस्कार शिबिर दिनांक 28 एप्रिल ते दोन मे या कालावधीत संपन्न होत आहे. चिन्मय मिशन अंतर्गत आयोजित बालसंस्कार शिबिरासाठी अध्यक्ष सौ.मालती कुलकर्णी, सौ.आर्चना चिकटवार, सौ.आर्चनाबेद्रे सौ.आशा चन्नावार सौ.संगीता गोजे, लक्ष्मी बूक्का पाटील, सौ,सूरेखा वझरकर हे परिश्रम घेत आहेत.