शास्त्री प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय शालेय समिती अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संतोष कुलकर्णी तर, प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य बालाजी चटलावार,अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपुरे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी संस्कृती ज्ञान परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल कु.योगेश्वरी संतोष घोणसीकर हिचे मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर तर्फे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, सहशिक्षक श्याम गौंडगावे व अर्चना सुवर्णकार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संतोष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व सांगितले तसेच,आपण ‘भारत माझा देश आहे ‘या प्रतिज्ञेप्रमाणे आपण वागले पाहिजे.संस्कारक्षम बनून आपल्या समाजासाठी, देशसेवेसाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे.विद्यार्थी व पालकांसाठी उद्बोधनात्मक मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपला सर्वांगिण विकास साधण्याचे आवाहन केले.
सुत्रसंचलन श्याम गौंडगावे, सचिन आगलावे तर आभार श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.