उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त्य आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरव

उदगीर (एल.पी.उगीले) : सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध कार्यालयातील कर्मचा-यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र दिनानिमित्त तालुका क्रीडा संकुल येथे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आ.संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देवून स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार ही केला.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, पो.नि. राजकुमार पुजारी, पो. नि. दिलीप गाडे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव,सहाय्यक निबंधक नांदापूरकर बी.एस.,तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, भरत चामले, प्रा.श्याम डावळे, सय्यद जानीमियाँ, वसंत पाटील, अनिल मुदाळे, ज्ञानेश्वर बिरादार, समीर शेख, शफी हाशमी, हनमंत शेळके, नरसिंग शिंदे, इब्राहिम नाना शेख,मधुमती कनशेट्टे, ऍड.वर्षा कांबळे, वैशाली कांबळे,सतीश कांबळे, विजयकुमार स्वामी, प्रकाश राठोड, बाबासाहेब सुर्यवंशी, गोरखनाथ भंडे,अनिता येलमटे, प्रीती दुरुगकर, आदी उपस्थित होते.